कौतुक कुणाला नको असतं
कौतुक कुणाला नको असतं. अगदी लहान बाळापासून ते वयोवृद्ध आजी-आजोबांपर्यंत कुणालाही कौतुकाचे शब्द कानावर पडले की भारीच वाटतं, काहीतरी चांगलं केलंय, करतोय याची पावती मिळाल्यासारखं असतं ते. पण कौतुकाची हल्ली एक गंमत झाली आहे. ती म्हणजे कौतुक करण्यापेक्षा स्पष्ट बोलण्याकडे जास्त भर दिला जातो आहे. खरं आणि स्पष्ट बोलण्याच्या नावाखाली आपण हे विसरायला लागलो आहोत की कायम (सतत) खरं आणि स्पष्ट बोलणं यातून फार काही समोरच्याचा फायदा होतो असं नाही. खरंतर जिथे दोन्हीचा balance दिसून येतो तिथे लोक जास्त proactive दिसून येतात. समोरची व्यक्ती जेव्हा मला पूर्णपणे समजून घेऊन माझ्या चुका किंवा कमतरता दाखवते तेव्हा त्यामध्ये बदल व्हायला हवा याची गरज माझ्याही मनात निर्माण होते, पण फक्त चुका दाखवल्या जात असतील, कमतरता दाखवल्या जात असतील तर नाही ऐकलं जाणार तुमचं. सध्या सगळ्यात प्रचलित वाक्य जे अनेकजणं गर्वाने वापरतात ते म्हणजे "I am brutally honest". त्यांना नक्की विचारावंसं वाटेल की honesty दाखवण्यासाठी brutal का व्हावं लागतं? You don't have to..! आणि मग ही honesty एखाद्याचं कौतुक करताना का ना...