Compromising... OR Communicating & Understanding...!

लग्न हा विषय आला की त्याबरोबर आपोआपच compromise हा शब्द वापरला जाताना दिसतोच. जणू काही compromise हा लग्नाला समानार्थी शब्दच आहे. खरंतर समानार्थी नसला तरी लग्नाबरोबर जुळलेला शब्द असल्याचे आपल्याला नाकारताही येणार नाही. एखादे जोडपे जर म्हणाले की, आम्ही कधीच compromise करत नाही, तर विश्वास बसणे अवघड आहे.

पण मग compromise करून नातं टिकविण्याचा जर प्रयत्न होत असेल तर नक्कीच इथे एकमेकांबरोबर संवाद साधण्याची नितांत गरज आहे हे ताबडतोब लक्षात घ्यायला हवे. Compromise करून नाते जगण्यापेक्षा "संवाद न साधता" निभावले जाणारे नाते जास्त suffer होताना दिसते. जर आपण आपल्या जोडीदाराशी संवाद साधू शकलो तर हे नाते understanding कडे जास्त जाताना दिसेल.

आपल्या जोडीदाराच्या आवडणाऱ्या गोष्टीबद्दल त्याचे कौतुक करणे, न आवडणाऱ्या गोष्टी मोकळेपणाने त्याच्यापर्यंत पोचवणे, एकमेकांकडून असलेल्या अपेक्षा, स्वप्न एकमेकांना सांगत राहणे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे एकमेकांमध्ये होत जाणारे बदल (मानसिक, भावनिक, शारीरिक, आर्थिक आणि इतर) याबद्दल "संवादातून स्वीकार निर्माण करत राहणे" ही या नात्याची खरी गरज आहे, हे समजून घ्यायला हवे. मुळातच understand करणे ही सातत्याने करत राहण्याची गोष्ट आहे कारण एक माणूस म्हणून प्रत्येक व्यक्तीमध्ये होत जाणारे बदल ही देखील एक नैसर्गिक क्रिया आहे हे लक्षात घ्यायला हवे.

आपण जेव्हा आपल्या जोडीदाराला communication च्या माध्यमातून understand करू लागतो तेव्हा आपोआपच compromise करत असल्याची भावना नाहीशी व्हायला मदत होऊ लागते.


   Photo by Almos Bechtold on Unsplash 

Comments

Popular posts from this blog

When parents come of age.

What exactly is it, to be a parent?

This is Age Appropriate... Isn't it..?