Posts

Showing posts with the label Marital

Sometimes I need space & I love you too...!

Image
  दोन संपूर्णपणे वेगळ्या व्यक्तींनी एकत्र राहणं म्हणजे काही प्रमाणात adjustment करणं , तडजोड करणं , आत्तापर्यंत आपण जसे जगत आलेले असतो त्यात रोज होणारा बदल पाहणं. माझ्या गोष्टी , वस्तू , पैसा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे "माझी space" (me time) कालपर्यंत ज्या फक्त माझ्या होत्या त्या आता कुणाबरोबर तरी रोज-रोज वाटल्या जाणार असतात.   सोबत राहायला लागल्यावर सगळ्यात अवघड होतं ते आपली space share करणं. आपण जेव्हा आपला partner निवडतो , त्याला/ तिला स्वीकारायला तयार असतो तेव्हा मी माझी म्हणून जी space आत्ता पर्यंत घेत होतो/ होते त्याबद्दल किंवा माझ्या partner ला हव्या असणाऱ्या space बद्दल काय विचार करतो/ करते ?   अनेकदा एकमेकांना space देणं कठीण होतं. कारण लग्न झालं म्हणजे एकमेकांच्या सुख-दुःखांची जबाबदारी घेणं compulsory असल्याची भावना त्यामागे असते. पण यात समोरची व्यक्ती माझा partner असला/ असली तरी एक स्वतंत्र व्यक्ती आहे ही बाजू पूर्णपणे दुर्लक्षित केली जाते. माणूस कितीही नात्यांमध्ये गुंतला तरी त्याला , त्याचे स्वतःशी असणारे , स्वतंत्र नाते जपायला मिळणे ही त्याची मुख्य गरज का...

Compromising... OR Communicating & Understanding...!

Image
लग्न हा विषय आला की त्याबरोबर आपोआपच compromise हा शब्द वापरला जाताना दिसतोच. जणू काही compromise हा लग्नाला समानार्थी शब्दच आहे. खरंतर समानार्थी नसला तरी लग्नाबरोबर जुळलेला शब्द असल्याचे आपल्याला नाकारताही येणार नाही. एखादे जोडपे जर म्हणाले की , आम्ही कधीच compromise करत नाही , तर विश्वास बसणे अवघड आहे. पण मग compromise करून नातं टिकविण्याचा जर प्रयत्न होत असेल तर नक्कीच इथे एकमेकांबरोबर संवाद साधण्याची नितांत गरज आहे हे ताबडतोब लक्षात घ्यायला हवे. Compromise करून नाते जगण्यापेक्षा "संवाद न साधता" निभावले जाणारे नाते जास्त suffer होताना दिसते. जर आपण आपल्या जोडीदाराशी संवाद साधू शकलो तर हे नाते understanding कडे जास्त जाताना दिसेल. आपल्या जोडीदाराच्या आवडणाऱ्या गोष्टीबद्दल त्याचे कौतुक करणे , न आवडणाऱ्या गोष्टी मोकळेपणाने त्याच्यापर्यंत पोचवणे , एकमेकांकडून असलेल्या अपेक्षा , स्वप्न एकमेकांना सांगत राहणे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे एकमेकांमध्ये होत जाणारे बदल (मानसिक , भावनिक , शारीरिक , आर्थिक आणि इतर) याबद्दल "संवादातून स्वीकार निर्माण करत राहणे" ही या नात्याची खरी ...