Emotional literacy is the key...!
भावनांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कायमच तोलून मापून राहिला आहे. त्यातूनही काही भावना पुरुषांसाठी तर काही भावना स्त्रियांसाठी असा भेद होतो आपल्याकडून. कदाचित म्हणूनच आपण एकमेकांकडे माणूस म्हणून पाहायला काहीवेळा कमी पडतो का?
मला काहीतरी feel होतंय, पण नक्की काय हेच सांगता येत नाही. कारण मुळातच भावनांना अनेक नावे आहेत, त्यांच्या अनेक shades आहेत हे आपण कधी ऐकलेलंच नसतं. आपल्याला, आपल्या भावनांना नावं देता येत नाही म्हणून त्या मांडणं आणि इतरांपर्यंत योग्य शब्दात पोचवणं अवघड जातं. म्हणूनच फळांची, फुलांची ओळख करून देतो तशी आपल्या मुलांना लहानपणापासूनच भावनांची देखील ओळख करून द्यायला हवी. भावनिकदृष्ट्या मुलांना सक्षम करणं ही आता काळाची गरज होऊ लागली आहे. बदलत्या काळातील तणावांना सामोरे जाताना त्यांना, त्यांचा Emotional Quotient म्हणजेच EQ देखिल strong करायला शिकवायला हवे.
शारीरिक स्वस्थाबरोबर त्यांच्या मानसिक स्वास्थ्याची देखील योग्य वयात, योग्य पद्धतीने देखभाल कशी घेत येईल, मनातील भावना व्यक्त करण्यासाठी मुलांना प्रोत्साहन देणे आणि त्यासाठी घरात योग्य ते वातावरण निर्माण करणे, याबद्दल या पुस्तकातून खूप सोप्या भाषेत उदाहरणे आणि काही activities च्या साहाय्याने समजावण्याचा आले आहे.
पालकांनी, मुलांनी आणि मुलांबरोबर संबंध येणाऱ्या प्रत्येकाने वाचावे असे, "जावे भावनांच्या गावा" हे डॉ. संदीप केळकर यांनी लिहिलेले, राजहंस प्रकाशनचे पुस्तक सर्वांना खूप उपयोगी पडेल यात मला काहीच शंका वाटत नाही. सर्वांनी हे पुस्तक नक्की वाचावे..
Comments
Post a Comment